ट्रेडिंग म्हणजे काय | ट्रेडिंग शिकायला किती दिवस लागतात | How To Learn Trending In 30 Days |

परिचय - ट्रेडिंग म्हणजे काय?

ट्रेडिंग म्हणजे काय | ट्रेडिंग शिकायला किती दिवस लागतात | How To Learn Trending In 30 Days |


ट्रेडिंग विषयी अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात.ट्रेडिंग बद्दल जाणून घायची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की ट्रेडिंग 30 दिवसात शिकू शकतो का. तर 

तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी देणार आहे. ट्रेडिंग शिकण हे खूप हे कठीण नाही. परंतु काहींना वाटत ट्रेडिंग हा खूप अवघड टॉपिक आहे. ही गोष्ट खरी आहे की ट्रेडिंग शिकण्यास खूप वेळ द्यावा लागतो. 

कोणतीही गोष्ट ही एका दिवसात शिकू शकत नाही. पण तुम्ही जर इमानदारीने मेहनत घेतली तर तुम्ही खूप लवकर शिकू शकता. ट्रेडिंग शिकण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. खूप साऱ्या टिप्स आणि 

ट्रिक्स चा वापर करून तुम्ही शिकू शकता. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला ट्रेडिंग काय आहे. व ट्रेडिंग आपण किती दिवसामध्ये शिकू शकतो या बद्दल पूर्ण माहिती देणार आहे.

ट्रेडिंग शिकायला किती दिवस लागतात ? Step By Step माहिती इन मराठी

ट्रेडिंग म्हणजे काय | ट्रेडिंग शिकायला किती दिवस लागतात | How To Learn Trending In 30 Days |

ट्रेडिंग शिकण्यास एका वर्षा पर्यंतचा वेळ लागू शकतो. हे तुमच्या मेहनती वर निर्भर आहे. तुम्ही जेवढा जास्त या विषयाचा अभ्यास कराल तेवढ्याच लवकर तुम्ही ट्रेडिंग शिकू शकता. जर तुम्हाला 

ट्रेडिंग करायची आहे तर तुम्हाला कंपनी बद्दल बेसिक फंडामेंतल माहिती असायला हवी. या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायला हव्यात. तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की कंपनी चे फंडामेंटल कशा प्रकारे 

केलं जातं. या साठी तुम्हाला एखाद्या स्टॉक मार्केट बद्दल माहिती असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधावा लागेल. व त्याच्याकडून पूर्ण माहिती शिकावी लागेल. आजकाल Youtube वर खूप सारे व्हिडिओज आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही ट्रेडिंग बद्द्दल शिकू शकता.

ट्रेडिंग मध्ये एकाच कंपनी मध्ये पूर्ण पैसे गुंतवू नका

ट्रेडिंग म्हणजे काय | ट्रेडिंग शिकायला किती दिवस लागतात | How To Learn Trending In 30 Days |

 ट्रेडिंग मध्ये आपण जेव्हा नवीन असतो. त्या वेळेस आपल्याला जास्त नॉलेज नसत. त्या वेळी काही लोकांकडून खूप चुका होतात जशे की कोणताच पाठ पुरवठा न करता एखाद्या कंपनी मध्ये गुंतवणूक करणे. 

जर तुम्ही अशी चूक केली तर तुमचे सगळे पैसे जाऊ शकतात. ट्रेडिंग च्या भाषेमध्ये पैशाला Capital म्हणतात. हे तुम्ही तीन भागांमध्ये वेगळे करून ठेवायला पाहिजे. ज्याने करून हे वाया जाणार नाही.

ट्रेडिंग मध्ये रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय असत


ट्रेडिंग मध्ये रिस्क मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा विषय असतो. ट्रेडिंग करताना तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस या दोन गोष्टींचा विचार करावा लागतो. जर तुम्हाला आज खूप लॉस झाला आहे. तर तुम्हाला ट्रेडिंग 

आजसाठी लगेच थांबवावी लागेल. कारण जर तुम्हाला लॉस होत असेल आणि तरीही तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला त्या दिवशी अजून लॉस होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट जमन खूप महत्वाचं आहे.

शेयर आणि बायर बघूनच पैसे इन्वेस्त करा


मित्रांनो जर तुम्ही इंटरा डे करत असाल तर तुम्हाला हे सर्वप्रथम बघायला हवे. या शेयर मध्ये सेलर की बायर काय आहे हे बघितले पाहिजे. कधी कधी काय होत काही लोक अप्पर सर्किट वाल्या शेअर्स 

मध्ये शॉर्ट सेलिंग करतात. हे खूप घातक ठरू शकत. यामुळे कधीच अप्पर सर्किटवाल्या शेअर्समध्ये शॉर्ट सेलिंग करू नका. जर केलं तर फक्त नुकसान होईल. 

मार्केट बंद होण्याअगोदरच आपली पोझिशन बंद केली पाहिजे


जर तुम्ही इंट्राडे करत असाल. तर तुम्ही शेअर मार्केट बंद होण्याअगोदरच आपली पोझिशन ही Quare Off केली पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमची पोझिशन बंद केली नाही तर 

तुमचा ब्रोकर तुमची पोझिशन बंद करेल. जर तुमच्या सोबत असं घडलं तर तुम्हाला जबरदस्त नुकसान होऊ शकतात.

ट्रेडिंगसाठी चार्ट चे अनालिसिस करावे


मित्रांनो जर तुम्हाला ट्रेडिंग करायचे आहे तर तुम्हाला सर्वप्रथम चार्ट अनालिसिस काय आहे हे समजून घ्यावे लागेल. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याच्याबद्दल तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जर 

तुम्ही चार्टला योग्य प्रकारे वाचू शकत नाही तर तुम्ही ट्रेडिंग मध्ये कधीच सफल होऊ शकत नाही. व चार्ट शिकण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे ट्रेडिंग शिकावी लागेल. कारण चार्ट अनालिसिस शिवाय ट्रेडिंग करणे हे अवघड आहे.

इतरांवर अवलंबून ट्रेडिंग होऊ शकत नाही


तुम्हाला सर्वात प्रथम हे लक्षात ठेवायचे की तुम्ही इतरांवर अवलंबून राहून कधीच ट्रेडिंग करू शकत नाही. यासाठी तुम्हाला स्वतःला परिश्रम घ्यावे लागतील. कधी कधी लोक इतरांचा ऐकून किंवा 

इन्फ्ल्यून्स होऊन ते सांगतील ते शेअर खरेदी करतात. व त्यानंतर त्यांना खूप मोठा लॉस सहन करावा लागतो. व त्या नंतर खूप टेन्शन येतं. त्यामुळे इतरांनी खरेदी केलेले शेअर्स खरेदी करू नका. स्वतः नॉलेज घ्या आणि स्वतः च्या रिस्क वर शेअर्स खरेदी करा.

पहिल्यांदा पैसा कमावण्यापेक्षा ट्रेडिंग शिकण्यासाठी वेळ द्या


ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग शिकत आहात त्यावेळेस पूर्णपणे ट्रेडिंग वर फोकस करा. पैसे कमवण्याकडे लक्ष देऊ नका. कारण ट्रेडिंग मधून लगेच पैसे येत नाही याला वेळ लागतो व वेळ द्यावा लागतो. जर तुम्ही 

ट्रेडिंग चांगल्या प्रकारे शिकलात तर तुम्ही त्यातून पैसा हा तर कमवणारच. यामुळे शिकण्यावर फोकस करा पैसे कमवण्यावर नाही. ट्रेडिंग मधून पैसे कमवण्यासाठी आत्मविश्वास खूप गरजेचा आहे.

पेपर ट्रेडिंग ची प्रॅक्टिस करा


जर तुम्ही ट्रेडिंगच्या फिल्डमध्ये नवीन आहात तर तुम्हाला पेपर ट्रेडिंग या पर्यायाचा वापर करावा लागेल. पेपर ट्रेडिंग शिकणे हे सर्वात चांगले आणि सोपे ट्रेडिंग आहे. यामध्ये तुम्हाला रियल मध्ये कोणतेही प्रॉफिट 

आणि कोणताही लॉस होत नाही. म्हणजेच तुम्ही यामध्ये विविध प्रकारच्या पद्धतींचा वापर करून ट्रेडिंग शिकू शकता. व नवनवीन पद्धती कशाप्रकारे काम करतात याची प्रॅक्टिस करू शकता. जर 

तुम्हाला पेपर ट्रेडिंग करताना प्रॉफिट झाला तर तुम्ही तीच पद्धत रियल ट्रेडिंग मध्ये वापरू शकता आणि तिकडूनही प्रॉफिट कमवू शकता. पेपर ट्रेडिंग मध्ये जर तुम्हाला प्रॉफिट झाला तर तुम्हाला 

आतून कॉन्फिडन्स येतो. जे लोक विदाऊट प्रॅक्टिस रिअल ट्रेडिंग करतात त्यांना पूर्णपणे लॉस होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वात प्रथम ट्रेडिंग करताना पेपर ट्रेडिंग चा वापर करा व त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा आणि त्यानंतरच रियल ट्रेडिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट करा.

FAQ


1) शेअर ट्रेडिंग म्हणजे काय?
Answer शेअर ट्रेडिंग म्हणजे नफा कमवण्यासाठी आपण जेव्हा शेअर्स खरेदी आणि विक्री करतो त्याला शेअर ट्रेडिंग असे म्हणतात. यामध्ये ऑनलाईन प्रकारे शेअर खरेदी आणि विक्री केले जातात.

2) ट्रेडिंगचे किती प्रकार आहेत?
Answer ट्रेडिंग वेगवेगळ्या प्रकारे केली जाते यामध्ये चार व्यवहार चे प्रकार आहेत. यामध्ये डे ट्रेडिंग, पोझिशन ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आणि स्कॅल्पिंग अशा प्रकारचे चार ट्रेडिंग चे प्रकार आहेत.

3) इक्विटी ट्रेडिंग फायदेशीर आहे का?
Answer होय, इक्विटी ट्रेडिंग हे फायदेमंद आहे परंतु याच्यामध्ये धोका तेवढाच आहे ज्या व्यक्तीला ट्रेडिंग बद्दल चांगले ज्ञान आहे तोच माणूस यातून चांगल्या प्रकारे प्रॉफिट काढू शकतो.

4) इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मी किती गुंतवणूक करावी?
Answer इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जर तुम्ही नवीन आहात तर तुम्ही पाच ते दहा हजार रुपये एवढी गुंतवणूक करू शकता. व यानंतर शिकत शिकत जर तुम्हाला ट्रेडिंग मधील ज्ञान आले तर तुम्ही यापेक्षा जास्त पैसे गुंतवू शकता.

5) नवशिक्याने स्टॉक कधी खरेदी आणि विक्री करावी?
Answer जर तुम्ही ट्रेडिंग मध्ये नवीन आहात तर तुम्ही स्टॉक सोमवारी खरेदी करावेत आणि शुक्रवारी स्टॉक विकावे अशा प्रकारे केलं तर तुम्हाला चांगलं प्रॉफिट होईल.

Read More :-
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.