Jio Cloud मध्ये फोटो अपलोड कसे करायचे l how to upload photos in Jio Cloud in marathi l

Jio Cloud Storage काय आहे ?

Jio Cloud मध्ये फोटो अपलोड कसे करायचे l how to upload photos in Jio Cloud in marathi l
   
 जर तुमच्याही मनामध्ये प्रश्न पडला आहे की जिओ क्लाउड मध्ये फोटो अपलोड कसे करायचे? तर तुम्ही योग्य जागेवर आलेला आहात. या पोस्ट मध्ये तुम्हाला जियो क्लाउड मध्ये फोटो कसे अपलोड करायचे याबद्दल साविस्तर माहिती देण्यात येणार आहे. मित्रानो जियो क्लाउड ही एक स्टोरेज जमा करून ठेवणारे ॲप्लिकेशन आहे.

      जियो क्लाउड हे रिलायन्स कंपनी ने तयार केलेले आहे. यामधे तुम्ही तुमचा पर्सनल डाटा उदाहरण म्हणजे फोटोज्, व्हिडिओज,इंपॉर्टन्ट PDF फाईल्स इत्यादी सारख्या गोष्टी साठवून ठेवू शकता. जियो क्लाउड मध्ये जेव्हा तुम्ही SIGNUP करता त्या वेळेस तुम्हाला ५ GB सोटेज दिले जाते. 

     जियो क्लाउड Storage मध्ये अपलोड केलेले डॉक्युमेंट हे कायम सेफ राहतात. जर तुमच्या मोबाईल मधील स्पेस फुल झाली असेल तर तुम्ही या ॲप्लिकेशन चा वापर करू शकता.


Jio Cloud Storage मध्ये फोटोज् व इतर डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे ?


जर तुम्हाला जियो क्लाउड मध्ये फोटो अपलोड करायचे आहेत तर तुम्ही पुढील प्रमाणे स्टेप्स चा वापर करून फोटोज् किंवा कोणतेही महत्वाचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता.

पहिली स्टेप :- सर्वात प्रथम तुम्हाला Jio Cloud Storage ही ॲप्लिकेशन गूगल प्ले  स्टोर वरून डाउनलोड करायची आहे. ॲप ओपन करून त्यामध्ये जियो क्लाउड या आयकॉन वर क्लिक करा.

Jio Cloud मध्ये फोटो अपलोड कसे करायचे l how to upload photos in Jio Cloud in marathi l


दुसरी स्टेप :- त्या नंतर तुम्हाला उजव्या बाजूला My Files असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

Jio Cloud मध्ये फोटो अपलोड कसे करायचे l how to upload photos in Jio Cloud in marathi l

तिसरी स्टेप :- माय फाईल्स वर क्लिक केल्या नंतर प्लस या आयकॉन वर क्लिक करा. या नंतर तुम्हाला Gallary चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

Jio Cloud मध्ये फोटो अपलोड कसे करायचे l how to upload photos in Jio Cloud in marathi l


चौथी स्टेप :- यानंतर तुम्हाला गॅलरी मध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट अपलोड करण्याचा ऑप्शन दिसेल तुम्ही त्या ठिकाणी तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता.

Jio Cloud मध्ये फोटो अपलोड कसे करायचे l how to upload photos in Jio Cloud in marathi l



Jio Cloud Storage चे फिचर्स काय आहेत?


जियो क्लाउड तुम्हाला Extra Storage प्राधान्य करते. परंतु या बरोबरच तुम्हाला यामधे विविध फिचर्स मिळतात.

Auto Backup :- या फिचर्स चा वापर करून तुम्ही कधीही तुमचा पूर्ण डेटा चा बॅकअप घेऊ शकता.

Contact Backup :- याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट चा ही बॅकअप घेऊ शकता. ज्या वेळेस तुम्ही तुमचा मोबाईल रिसेट करता त्या वेळेस तुम्हाला या फिचर्स चा खूप उपयोग होतो.

Data Sharing Option :- यामधे तुम्हाला शेअरिंग ऑप्शन दिला जातो. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या ॲप मधील डाटा विविध सोशल प्लॅटफॉर्म वर शेअर करू शकता.

Easy Access and Storage Access :- तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तुमच्या फोन मधील डेटा वापरू शकता. या बरोबरच तुम्ही जियो क्लाउड ॲप मध्ये जास्तीचे storage सुद्धा वापरू शकता. 

Mobail Storage :- काही लोकांना प्रश्न पडला असेल की ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मधील storage चा वापर तर नाही ना करत. तर मित्रानो या मध्ये जर तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट अपलोड केले तर तुमच्या मोबाईल मधील कोणतेही storage use होत नाही.

Document Scanner :- या फिचर्स चा वापर करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून ते अपलोड करू शकता. हा फिचर्स खूप उपयोगात पडू शकतो.

Offline Mode :- याच बरोबर तुम्हाला ऑफलाईन मोड ही दिलेला आहे. या फिचर्स चा वापर करून तुम्ही हे ॲप ऑफलाईन ही वापरू शकता. परंतु अपलोड व इतर गोष्टींसाठी तुम्हाला इंटरनेट ऑन करावे लागेल.


Jio Cloud Storage मध्ये डॉक्युमेंट ठवणे सुरक्षित आहे का ?


खूप लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की जियो क्लाउड ॲप सुरक्षित आहे का? तर मित्रानो हे ॲप एकदम सुरक्षित आहे. यामधे तुम्ही जर  महत्वाचे फोटोज् किंवा व्हिडिओज ठेवले. 

तर ते कायम सुरक्षित राहणार. जियो  क्लाउड ॲप तुम्ही अपलोड केलेल्या डॉक्युमेंट ला एका सुरक्षित सर्व्हर वर अपलोड करून ठेवते. व तुम्हाला ५ GB पर्यंत Storage वापरायला भेटते. जर तुमचे डॉक्युमेंटस ५ जिबी पेक्षा जास्त आहे तर तुम्हाला storage जास्त हवे असेल तर ते विकत घ्यावे लागते. 

Conclusion निष्कर्ष :-


     जियो क्लाउड Storage ॲप चा वापर करून तुम्ही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट सुरक्षित जतन करून ठेवू शकता. या मध्ये तुम्हाला ५ जीबी पर्यंत चे Storage मिळते तुम्ही या ॲप चा फ्री मध्ये वापर करू शकता. जियो मोबाईल जर रिसेट झाला तर तुमचे सर्व महत्वाचे डॉक्युमेंट,कॉन्टॅक्ट,फोटोज्,व्हिडिओज,फाईल्स या डिलिट होतात.
     
       त्यामळे या ॲप ला तुमच्या फोन मध्ये इंस्टॉल करा आणि तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट यामधे जतन करा. ज्याने करून तुमचे डॉक्युमेंट कायमस्वरूपी सेफ राहतील.

FAQ


1) जियो क्लाउड एप मध्ये Storage खरेदी करू शकतो का ?
Ans या ॲप मध्ये तुम्हाला ५ जिबि चे storage दिले जाते. परंतु जर हे storage फुल झाले तर तुम्ही या ॲप मध्ये storage विकत घेऊ शकता.

२) क्लाउड Storage कशा प्रकारे काम करते ?
Ans क्लाउड सर्व्हर मध्ये अपलोड केलेले फोटो कायम सुरक्षित ठेवण्याचे काम करते.

३) क्लाउड Storage चे ३ प्रकार कोणते आहेत ?
Ans Object Storage, File Storage, Block Storage हे तीन वेगवेगळे क्लाउड storage चे प्रकार असतात.

४) क्लाउड storage चे फायदे काय आहेत ?
Ans क्लाउड storage चा वापर करून आपण आपला डेटा सुरक्षित जतन करून ठेवू शकतो. याबरोबरच आपला डेटा हा कायम सेफ राहतो. जियो क्लाउड storage बरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्लाउड storage इंटरनेट वर उपलब्ध आहेत.

५) जियो क्लाउड storage सुरक्षित आहे का?
Ans जियो क्लाउड हे अतिशय सुरक्षित आहे. या मध्ये तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट हे कायम स्वरुपी सेफ राहतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.